प्रारंभ नव्या पर्वाचा

मित्रानो नमस्कार,
वास्तविक पाहता हा ब्लॉग तयार करून बरेच महिने झाले. पण ब्लॉग वापराचे अज्ञान म्हणा किंवा काहीसा आळस म्हणा, केवळ एक औपचारिक कृती म्हणून ब्लॉग तयार केला होता. पण आता वाटते, माझे चुकलेच. माझे मन रिते करण्याचा हा अत्यंत चांगला पर्याय असताना, मी उगाचच या माध्यमाचा वापर टाळत होतो.
पण आता नाही....मला हे जमवलेच पाहिजे.
कुणा इतरांसाठी नसले तरी फक्त माझ्यासाठी.
तर मित्रांनो, आता मी तुमच्याशी थोडं थोडं, जसं जमेल तसं मी बोलत राहणार आहे..मला सहन कराल ना?
काय? मी कोण?
मी...पण जाऊ दे ना या मी ला तरी काय अर्थ आहे. हा मी च बाजूला सारून बोलायचं म्हणतोय. बघू जमतंय का?
आणि मी काय हो, तुम्ही माझ्याकडे जसे पाहाल, तसा मी तुम्हाला जाणवेन.
असा मी असामी, जो जसा समजेल तसा मी.
हा प्रारंभ आहे,
नव्या पर्वाचा.
माझ्यातीलच उमेदीचा,
तुमच्या काही आठवणींचा गोफ मनात विणलाय,
तो तुम्हापुढे उलगडण्याचा.
चला तर मग,
माझ्यासोबत आठवणींच्या या निबीड जंगलात,
पाहू या काय काय हाताशी लागतंय ते..
नाहीच काही मिळालं तर, परतीच्या खुणांवरून येऊ पुन्हा आपापल्या मुक्कामाला.
पण सुरुवात तर करू या.

आपलाच
आनंद बल्लाळ

Comments

Popular posts from this blog